Thursday, October 15, 2009

प्रोजेक्ट सहल भाग २

अखेर सर्व सोपस्कार पार पाडुन ७ ला सरांच्या क्वार्टरपाशी पोचलो. सरांना फ़ोन केला . त्यानंतर सरांनी आवरायला बरोब्बर अर्धा तास घेतला. आता इतका वेळ आम्ही उशिर केला म्हणनार्या सरांनी केलेला उशिर मात्र माफ़ होता. असो जगाचा नियमच आहे, माझा पण मगाशी उशिर केलेल्या प्रसेनजीत वरचा राग निवळला .

साधारण ७.३० ला अम्ही IIT सोडलं. वाटेत नंदीबाबू म्हणून एकांना सोबत घेतले. खरगपूर हून कोलकत्ता सधारण १२० - १३० कि.मी. आहे. खरगपूरच्या अगदी जवळून राष्ट्रिय महामार्ग क्रंमांक ६ जातो , ज्याला ’बॊम्बे रोड’ असा म्हणतात. खरगपूरहून कोलक्त्त्याच्या दिशेला थोड्याच अंतरावर विशाखापट्टणम ला जाणारा फ़ाटा फ़ुटतो. हा रा. म. क्रं. ५ आहे, आणि हा महामार्ग सुवर्ण चतुश्कोन योजनेतीलच एक आहे. तसाच पुढं आम्ही कोलक्त्त्यातून आसनसोल ला जायला वापरलेला रा. म. क्रं. २ हा पण त्यातलाच एक. मला ड्रायविंग करणे व हिंडण्याची हॊस असल्याने मी सुरुवातीलाच ड्रायवर शेजारची जागा बळकावली होती. अर्थात मला याचा पुढ खुप फ़ायदा झाला. पश्चिम बंगाल मध्ये मी या आधीपण एकदा हिंडायला गेलो होतो. दोन्ही वेळच्या प्रवासांत मी एक गोष्ट अनुभवली रा.म. सोडून बंगाल मधिल कुठलेच रस्ते धड नाहित. असो दुसर्यांना काय नावं ठेवायची , महाराष्ट्रात पण बर्याच ठिकाणी हिच परिस्थिती आहे. रस्ताच्या दुतर्फ़ा लांब लांब पसरलेली हिरवीगार भातशेती सगळीकडे पहायला मिळते. इथलं वातावरण मात्र खुप लहरी आहे. बंगाल च्या उपसागरात जरा कुठं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की इथं पावसाचा थयथयाट सुरू असतो. साधी वादळं सोडा चक्रिवादळ तर दर वर्षी एकदा येतच. ऊन्हाळ्यामधे प्रचंड गर्मी तर थंडीत संध्याकाळी ४ लाच अंधार पडून थंडीच साम्राज्य सुरू होत.

तर दरमजल करीत मध्ये नाश्ता करुन आम्ही कलकत्त्यात १०-१०.३० ला पोचलो. रविवार असल्याने रस्त्यांवर जास्त वाहतूक नव्हती. Wockhardt हॊस्पिटल मध्ये सरांच काम होतं , ते तिथ गेले. मी खालीच प्रसेनजीत बरोबर गप्पा मारत थांबलो. मध्यंतरात आमच्या ड्रायवर ची एक सिगारेट ओढून झाली. प्रसेनजीत हा एक खुप प्रामाणीक आणि आयुष्याकडून कमीत कमी अपेक्षा ठेवणारा इसम आहे. त्याच्याशी गप्पा मारुन मी आमच्या डिपार्टमेंट मधल्या आतल्या खबरी काढत बसलो होतो ! आमच्या गप्पां मधून मला आमचे सगळे प्रोफ़. कसे ऎषोआरामात राहतात याची माहिती मिळत होती.

साधारण अर्ध्या तासाने आम्ही तिथून निघालो. कोलकत्त्यात प्रोफ़. प्रणब दत्तान्ना सोबत घेउन आम्ही मार्गाला लागलो. कोलकत्त्यातून बाहेर पडताना हुगळी नदीवर महाकाय असा "दुसरा विवेकानंद उड्डाणपूल" आहे. उत्कृष्ठ प्रकारे रस्ते आणि उड्डाणपूलांची रचना करुन सिग्नल टाळले आहेत. इथं एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे विवेकानंदांच्या नावाने मुळात जुना "हावडा ब्रिज" प्रसिध्ध असताना पण नविन पूलाला "दुसरा विवेकानंद पूल " असा नाव दिलेलं आहे. (इथं कोणाची हिम्मत नाही झाली गांधी किंवा नेहरू घराण्यातल्या लोकांची नावं देण्याची.)

(क्रमशः)

No comments:

Post a Comment