Thursday, October 15, 2009

प्रोजेक्ट सहल . भाग १

पाश्वभूमी : -

मी IIT मध्ये M.Tech २ र्या वर्षात शिकतो आहे. माझ्या प्रोजेक्ट संबंधी प. बंगाल मधील आसनसोल या ठिकाणी भेट देउन आलो , त्याचा हा प्रवास वृत्तांत. माझ्या सोबत माझे गाइड प्रोफ़. अविनाश सिन्हा. , प्रोफ़. प्रणव (बंगालीत प्रणब !! ) दत्ता, अणि २ लॆब मधील कर्मचारी होते.

{या वर्णना मध्ये मी शक्यतो मी ज्या कामा साठी तिथं गेलो होतो त्या विषयी जास्त लिहीणार नाही ,कारण त्यातल्या तांत्रीक बाबी इथ समजावण अवघड होइल.!!}

पहिला दिवस.

आदल्या दिवशी सरांसोबत ठरल्याप्रमाणे सकाळी ५.३० ला उठून व आवरुन ६ वा. मि तयार होतो. आमच्या वसतीगृहाच्या फ़ाटका जवळ जाउन थांबलो होतो. मी ड्रायवर ला अगोदरच फोन करुन कळवून ठेवलं होत. ६ वाजता येनारा ड्रायवर चहा वगॆरे पिउन ६.१५ पर्यंत आला!! तेवढ्या सरांचा फोन येउन गेला होता. मला एका लॆब कर्मचार्या ला वाटेत घेउन (जरी तो वाटेत नसला तरी !!) सरांकडे लवकरात लवकर पोचायचा होत. ६.१५ ला गाडी आली. चकाकती महिन्द्रा स्कॊर्पियो. मी IIT मध्ये आल्यापासून पहिल्यांदाच चांगल्या गाडीत बसत होतो !! खरगपूर सारख्या ठिकाणी चांगली गाडी बघायला मिळणा मुश्किल तिथे त्यात बसायचा सोडाच !! मग तिथून स्टाफ़ क्वार्टर मध्ये जाऊन एका ला सोबत घ्यायला गेलो. तिथं आम्ही साधारण ६.३० पर्यंत पोचलो . तिथल्या महाशयांच अजून दात घासणं सुरु होतं ! मनातल्या मनात शिवी हासडली , कारण मला त्या उशीर करण्यान काही फ़रक पडत नसला तरी आमच्या मास्तरांच कुठं आहात असे २ फ़ोन येउन गेले होते. खरंतर त्यांना वाटेत कोलक्त्त्यात रक्त तपासणी करायची होती, त्या साठी त्यांना काहिही खायचं न्हवतं. अखेर अम्ही स्टाफ़ क्वार्टर मधून निघालो , अणि ड्रायवर ने बोंम्ब टाकला की सरां कडे जाण्याआधी गाडीत डिझेल भरायचा आहे . त्याना काय जाताय , सरांचा तोफ़खाना झेलायला मी होतोच की !
  (क्रमशः)

No comments:

Post a Comment