Saturday, October 17, 2009

प्रोजेक्ट सहल भाग ४




तेथिल एका जरा उंच बेटावर एक अतिथी गृह उभारलय. त्यावर जाण्यासाठी एक छोटा पूल उभारला आहे. आम्ही ज्या गेस्ट हाउसवर राहिलो होतो ते अगदी आलिशान नसलं तरी टापाटिप होत. तिथ मला बड्या शासकिय अधिकार्यांची बडदास्त कशी राखतात ते अनुभवायला मिळालं . आमच्या सरांमुळ आमचं अगदी उत्तम अगत्य झालं. ५ जण अणि ३ खोल्या , त्यात दोन्ही प्रोफ़. ची सोय खास कक्षात झाल्याने व उरलेल्या दोघांनी एकत्र राहण पसंत केल्याने मला आपसूकच एकट्याला खोली मिळाली. खोली निटनेटकी होती , २ पलंग होते. बाल्कनीतून धरणाच्या सरोवराचं अगदी मनोहारी दृष्य दिसत होतं. गेस्ट हाउस च्या परिसराला कुंपण होतं आणि छान बाग तयार केली होती. बाथरुम तर साधारण लोकांच्या घरात असणार्या स्वयंपाकघरा एवढं होत. रूम वर जरा हात-पाय-तोंड धुवून चहाला गेलो. चहा पिउन झाल्यावर आमच्या गेस्ट हाउस पासून धरणा पर्यंत साधारण १.५ कि.मी. चा फ़ेरफ़टका मारुन आलो. चालता चालता मी सरांशी इलेकट्रीकल संबंधी बर्याच गप्पा मारल्या. छान वाटलं. धरणाच्या भिंतीवरुन गाडी पलिकडे जाउ शकेल एवढी रूंदी आहे. सधारण ७.३० ला रुमवर आलो. ८.३० वाजता जेवण्या साठी बोलावण आल. तिथ पण खातीरदारी अगदी व्यवस्थित राखण्यात आली होती. जेवण अगदी उत्तम होतं. विविध प्रकार सुंदर चिनीमातीच्या भांड्यातून वाढले जात होते. जेवण झाल्यावर त्या गेस्ट हाउस च्या आवारात चक्कर मारली, मग रूम वर येउन माझ थोड काम उरल होत ते पुर्ण केलं. मग छान AC ची हवा खात निद्रेच्या आधीन झालो.

दुसर्या दिवशी सकाळ सकाळ ६ वाजताच (!!) बेड टी मिळाला. मग म्हटंल कधी नव्हे ते सकाळी लवकर उठलो आहे, जरा हिंडून यावे गेस्ट हाउस च्या मागच्या बाजूला काय आहे ते बघून यावे. (हा असा विचार केल्यावर मला उगाचच मी एकदम मोठ्ठाझाल्यासरख वाटल. कारण मी आई बाबा जेव्हा अस फ़िरायला जायचो तेव्हा बाबा मला असाच सकाळी फ़िरायला न्यायचे!! गालातल्या गालात हसून आवरायला घेतल.) मस्त सकाळच्या स्वच्छ अणि थंडगार वार्यात हिंडून खुप भारी वाटत होत. गेस्ट हाउस च्या मागे जवळच धरणामूळे तयार झालेल्या सरोवराचा काठ होता. त्या काठाजवळ एक छोट देवीच मंदीर होत. आजूबाजूला मस्त झाडी होती. सरोवराच पाणी सकाळच्या कोवळ्या उन्हात अप्रतीम दिसत होत. पाण्यातली छोटी बेट अगदी भारी दिसत होती. मग रूमवर येउन ८.३० ला नश्ता करुन आसनसोल साठी निघालो.

{त्यानंतर २.३० पर्यंत काम चालू होत. त्या कामाच्या तपशीलात शिरत नाही. फ़क्त सांगायसारखी गोष्ट म्हणजे काम बरचस अपयशी ठरले.!! पण या एकंदरीत २ दिवसांच्या सहलीत(!!) बरच कही शिकायला मिळाल. साधारण रात्री १० वाजला परत होस्टेल वर पोचलो}

(समाप्त)

No comments:

Post a Comment