Thursday, October 15, 2009

प्रोजेक्ट सहल भाग ३

या नंतर निवांत प्रवास झाला. (अर्थात वातानुकूलीत गाडी असल्याने. कारण बाहेर ऊन मी म्हणत होत) . कोलकत्त्यातून बाहेर पडताना सिंगूर लागलं , टाटांच्या महत्वकांक्षी नॆनो प्रकल्पाचे अर्धवट अवशेष बघून वाईट वाटलं. हा प्रकल्प प्रचंड जागेत पसरलेला आहे. कही प्रश्न मनात घोळत राहिले , कोणाला काय मिळालं प्रकल्प बंद पाडून ?? बांधकाम झालेल्या जमिनी जरी शेतकर्यांना परत मिळाल्या तरी ते त्यावर शेती करू शकणार आहेत ?? वाटेत असे बरेच प्रकल्प दिसले.
तिथून थोड्या अंतरावर आम्ही जेवण उरकून घेतलं. (धाब्यावर आमच्या सरांना जेवण जरा हो की नाही करतच गेलं). माझी थोडी गोची झाली होती. एकतर सगळे माझ्यापेक्षा कमित कमी १०-१५ वर्षांनी मोठ्ठे होते आणि त्यात दोन्ही सर म्हणजे डिपार्टमेंट मधील बडे होते. त्यामूळे काय बोलायचं हे मला सुरुवातीला सुचतचं नव्हत. त्यांच्याच विषयांमध्ये मी आपला माना डुलवल होतो. वाटेत एक छोटं गाव लागलं , त्या गावाच नाव लक्षात नाही पण वॆशिष्ठ्य असा, की ते गाव भारताच्या पूर्वेकडील जुन्या वाहनांचे सुटे भाग मिळणारं आगार होतं. रस्ताच्या दुतर्फ़ा जुन्या वाहनांचे ढिगच ढिग लागले होते. लष्कराच्या जुन्या वाहनांपासून , जुन्या फ़टफ़ट्यां पर्यंत सगळी वाहनं तिथं होती.

आमची राहण्याची सोय "दामोदर खोरे" प्रकल्पाच्या मॆथन धरणा जवळ असलेल्या गेस्ट हाऊस मध्ये करण्यात आली होती. हे मॆथन धरण प.बंगाल व झारखंड यांच्या सीमेवर आहे. याचे दोन्ही बाजूंचे काठ वेगवेगळ्या राज्यात येतात. गेस्ट हाऊस झारखंड कडील भागात आहे. हे धरण पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यात आले आहे. छोट्या प्रमाणावर विद्युत निर्मीती पण होते. (इथ माझ्यातला इलेक्ट्रीकल अभियंता जागा होतो !!) हे एक नॆसर्गिक धरण आहे. धरणाच्या सरोवरात बरीच छोटी झाडांनी आच्छादलेली बेटं आहेत. या भागातल्या झालेल्या दमदार पावसाने बरीच बेटं अर्धीअधीक बुडाली होती. बहुतेक याच कारणानं ती निर्जन होती.
(क्रमशः)

1 comment: